संगमनेर ः येथील बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. या लिलावात मंगळवार (ता. १२) रोजी झालेल्या लिलावा पेक्षा आज झालेल्या लिलावात कांद्याच्या प्रतिक्विंटल भावात तब्बल १०० रुपयानी वाढ झालेली आहे.
येथील बाजार समितीत तालुक्यासह शेजारील तालुक्यांमधून कांद्याची आवक झाली. एक नंबर कांद्याला १८५१रुपायंचा भाव मिळाला. कांद्याच्या ५८०७ गोण्यांची आवक झाली. कांद्याचे प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव ः एक नंबर कांदा ः १४०० ते १८५१, दोन नंबर कांदा ः ९०० ते १३००, तीन नंबर कांदा ः ५०० ते ८००, चार नंबर कांदा ः २०० ते ४००, सुपर गोळा माल ः १९५१ ते २००१.
मंगळवार (ता. १२) कांद्याचे लिलाव झाले. कांद्याच्या ४२८० गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला १७५१ रुपयांचा भाव मिळाला. कांद्याचे प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव ः एक नंबर कांदा ः १३०० ते १७५१, दोन नंबर कांदा ः ९०० ते १२००, तीन नंबर कांदा ः ६०० ते ८००, चार नंबर कांदा )ः २०० ते ४००, सुपर गोळा ः १८०१ ते १८६०.
शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment