पारनेर ः येथील बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. पारनेर तालुक्यासह शेजारील तालुक्यांमधून कांद्याच्या ८८६९ कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला १९०० रुपयांचा भाव मिळाला. मागील लिलावाच्या तुलनेत कांद्याच्या दरात ३०० रुपयांनी वाढ झालेली आहे. आगामी काळात कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
येथील बाजार समितीत कांद्याचा लिलाव झाला. या लिलावात कांद्याचे एक तर चार व गोल्टी कांदा अशी प्रतवारी करण्यात आली. या प्रतवारीमध्ये सर्वाधिक भाव एक नंबर कांद्याला मिळाला आहे.
कांद्याचे भाव प्रतवारीनुसार पुढील प्रमाणे ः एक नंबर कांदा १७०० ते १९००, दोन नंबर कांदा ः १४०० ते १६००, तीन नंबर कांदा ः १००० ते १३००, चार ंनंबर कांदा ः ३०० ते ९००, गोल्टी कांदा ः १२०० ते १६७५.
रविवार (ता. १०) रोजी कांद्याचे लिलाव झाले. त्यावेळी एक नंबर कांद्याला १६०० रुपयांचा भाव मिळाला होता. रविवारी कांद्याच्या ६६९६ कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः १३०० ते १४००, दोन नंबर कांदा ः ११०० ते १२००, तीन नंबर कांदा ः ९०० ते १०००, चार नंबर कांदा ः २०० ते ५००, गोल्टी कांदा ः ९०० ते १३००.
शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment