शिक्षकांनी नियुक्तीच्या ठिकाणी राहणे सक्तीचे करा... पालकांमधून होतेय मागणी...



पाथर्डी ः तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. ही घटना घडल्यानंतर पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. २०११ पासून अशा प्रकारच्या १० घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. त्यातील ५ प्रकरणांत गुन्हे दाखल झाले असून उर्वरित प्रकरणांमध्ये तक्रार अर्ज दाखल आहेत. यातील अनेक प्रकरणं अजूनही न्यायप्रविष्ट आहेत."


या पार्श्वभूमीवर सर्वच शिक्षकांनी नियुक्तीच्या ठिकाणी राहणे सक्तीचे करावे, अशी जोरदार मागणी आता पालकांमधून होत आहे. पूर्वी शिक्षक गावात राहत असत, तेव्हा अशा घटना घडत नव्हत्या, असा आरोप पालकांकडून होत आहे.""गेल्या चार वर्षांत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने १० शिक्षकांना निलंबित केले आहे. त्यातील काही शिक्षकांवर गुन्हे दाखल असून उर्वरितांवर चौकशी सुरू आहे. तरीही असे प्रकार थांबताना दिसत नाहीत."

"या गंभीर घटनांचा थेट परिणाम जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्येवर होत आहे. शाळांवरील विश्वास ढासळत चालल्याने पालक मुलांना खासगी शाळेत घालण्याकडे वळत आहेत."

"या गंभीर घटनेवर जिल्ह्यातील कोणताही राजकीय नेता भाष्य करताना दिसत नाही. इतर मुद्यांवर बोलणारे नेते या विषयावर मात्र मौन बाळगून आहेत. त्यामुळे नागरिक विचारत आहेत. 

शिक्षकांना घरभाडे भत्ता मिळतो, तरीही ते नियुक्तीच्या ठिकाणी राहत नाहीत, ही गंभीर बाब आहे. यासाठी शासनाने आता सक्तीचा निर्णय घ्यावा आणि पालकांनी एकत्र येऊन जनआंदोलन उभारावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post