शिक्षण विभागात चहापेक्षा किटलीचा खडखडाट

अहिल्यानगर  :  येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कारभारावर या ना त्या कारणाने सध्या चांगलाच चर्चेत आहे. पाथर्डी तालुक्यातील शिक्षकाने चौथीच्या विद्यार्थीनीवर केलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर शिक्षण विभागावर पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. हे प्रकरणाचा निषेध होत असतानाच शिक्षण विभागातील चहा पेक्षा किटलीच्या खडखडाटाची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु झालेली आहे.


जिल्हा परिषदेतील मुख्यालयातील चहापेक्षा किटलीचा खडखडाट मोठा असल्याने सर्वजण त्रस्त झालेले आहे. या किटलीच्या खडखडाटाच्या तक्रारी अधिकाऱ्यांसह शिक्षकांमधून होत असल्या तरी त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरु आहे.




जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा कारभार नेहमीच चर्चेत राहत आहे. या शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागात केलेली आहे. तेव्हापासून शिक्षण विभागाचा कारभार सध्या चर्चेत आलेला आहे. 

संगमनेरमध्ये कांद्याला इतका भाव

जिल्ह्यातील सर्वच पंचायत समितील गटशिणाधिकारी, विस्तार अधिकारी यांच्यासह शिक्षकांचा शिक्षण विभागाशी संपर्क येत असतो. या शिक्षण विभागात काहींना वरिष्ठांनी खास सवलती दिल्याची चर्चा आहे. या सवलीतींमुळे ते अधिकारी इतरांवर नेहमीच तोरा दाखवित असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. 

याबाबत काहींनी शिक्षण विभागातील वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे. परंतु त्यावर काहीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.  विशेष म्हणजे त्या कार्यालयातील त्या कर्मचाऱ्याच्या त्रासाला इतरही सहकारी त्रस्त झाले आहे, अशी चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरु आहे.



त्या कनिष्ठ कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व अधिकार दिलेले आहेत का ते कोणत्या नियमानुसार दिलेले आहे. मग ते इतरांना इतके का बोलतात, असे एका अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.जिल्हा परिषदेतील चहा पेक्षा किटलीचा खडखडाट बंद व्हावा, यासाठी अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांचे एक शिष्टमंडळ लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरु आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post