अहिल्यानगर : शहरातील एका महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये दुचाकी लावत असताना एका विद्यार्थ्यावर चार अनोळखी व्यक्तींनी अचानक हल्ला केल्याची घटना मंगळवारी (ता. १९) दुपारी घडली. कृष्णा उमाप (वय १९, रा. सिद्धार्थनगर), असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, या हल्ल्यात त्याच्या डाव्या हाताला व पाठीला गंभीर दुखापत झाली आहे.
कृष्णा उमाप हा बारावीचा विद्यार्थी असून महाविद्यालयामध्ये येण्यासाठी मामाच्या नावावरील दुचाकी वापरत असतो. घटनेच्या दिवशी, तो महाविद्यालयात गेला असताना पार्किंगमध्ये काही तरुण गोंधळ घालत असल्याचे दिसले.
मास्क परिधान केलेल्या तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी अचानक त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला आणि शिवीगाळ केली. त्यापैकी एकाने लोखंडी रॉडने मारहाण केली. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment