पोलिसाच्याच घरी चोरी..


अहिल्यानगर ः 
 केडगाव लिंकरोड परिसरात चोरट्यांनी घरफोडी करत ६२ हजार ५०० रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना  १६ ऑगस्ट रोजी घडली. शिरूर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले संतोष बुधवंत (वय ३८) यांच्या घरी चोरी केली. 



बुधवंत हे कर्तव्यावर असताना त्याचवेळी त्यांची पत्नी अर्चना, आई मंदाबाई आणि मुले शिवांश व सुप्रिया रक्षाबंधनासाठी पाथर्डी येथील मूळ गावी गेले होते. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी अर्चना घरी परतल्यावर त्यांना घराचे लॉक तुटलेले आणि सामान आस्ताव्यस्त पडलेले आढळले. त्यांनी तातडीने संतोष यांना फोनद्वारे कळवले आणि डायल ११२ वर संपर्क साधला. 

पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता, बेडरूममधील कपाटाचे लॉक तुटलेले आढळले. चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड लंपास केले, असे फिर्याद म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post