मराठा आरक्षण: संयम, निर्णयक्षमता आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रभावी नेतृत्व

मुंबई : मराठा आरक्षण हा महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय इतिहासातील एक अतिशय संवेदनशील व जटिल विषय. वर्षानुवर्षे हा विषय प्रलंबित राहिला. अनेक समित्या आल्या-गेल्या, बैठका झाल्या, आंदोलने झाली, आश्वासनं दिली गेली… पण ठोस निर्णयाचा अभाव होता.


या साऱ्या प्रक्रियेत जे समितीचे आधीचे अध्यक्ष  करू शकले नाहीत, ते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केवळ एका महिन्याच्या आत करून दाखवलं — तेही कोणताही गोंधळ न करता, अतीशय संयम, समजूतदारपणा आणि कारभाराची स्पष्टता ठेवून.

विखे साहेबांनी मराठा समाजाच्या भावना समजून घेतल्या, कायद्यात बसणाऱ्या उपाययोजना शोधल्या आणि सर्व संबंधित यंत्रणांना एकत्र करून निर्णयाच्या दिशेने पावले टाकली. हे करताना त्यांनी कुठल्याही राजकीय गोंधळाला थारा दिला नाही. 

‘लोकप्रियते’साठी निर्णय न घेता, त्यांनी एक असा निर्णय घडवून आणला जो कायदेशीरदृष्ट्या टिकाऊ ठरेल आणि समाजाच्या अपेक्षाही पूर्ण करेल.

आज मराठा समाजाला पुन्हा एकदा आरक्षणाच्या दृष्टीने आशेचा किरण दिसत आहे. हे शक्य झालं, ते विखे पाटील यांच्या स्पष्ट भूमिका, निर्णयक्षमता आणि शांत संयमामुळे. त्यांचे मन:पूर्वक आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.


धन्यवाद साहेब! आपली ही सेवा आणि समाजप्रती असलेली निष्ठा निश्चितच प्रेरणादायक आहे असे मराठा समाज बांधव म्हणत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post