नुकसानीची पालकमंत्र्यांकडून पाहणी...

पाथर्डी : यापुर्वी कधीही झाला असा पाऊस मागील दोन दिवसात झाल्याने मोठ्या स्वरूपात नूकरसान झाले आहे.झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा समोर येण्यास वेळ लागेल. स्थायी आदेशा प्रमाणे तातडीची मदत देण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत.परंतु मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून अधिकची मदत मिळावी म्हणून विनंती करणार असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.


पाथर्डी तालुक्यात एकूण ४९हजार हेक्टर क्षेत्रावरील ६९हजार शेतकर्यांच्या शेती पिकांचे नूकसान झाले असून,३४गाय २५०कोंबड्या शेळी ५० करडू २५आणि २६ घरांची पडझड झाली असल्याचे सांगून राजू शिवाजी सोळंके हा ३९वर्षाचा इसम देवळाली नदीत व गणपत हरीभाऊ बर्डे हे ६५वर्षाचे गृहस्थ टाकळी मानूर तलावात वाहून गेल्याची घटना घडली असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले.ढगफुटीचाच प्रकार म्हणावा लागेल.ज्या ठिकाणी भेटी दिल्या त्या गावातील प्रत्येक जुन्या जेष्ठ लोकांनी असा पाऊस कधी पाहीलाच नव्हता.सुदैवाने यामध्ये मनुष्यहानी झाली नाही.


असे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की नदी ओढे नाले यांचे प्रवाह बदल्यामुळेच पाण्याचे प्रवाह नागरी वस्तीत आले.या भागात झालेली अतिक्रमण ही सुध्दा झालेल्या नूकसानीची कारण आहेत भविष्यात असे प्रसंग पुन्हा निर्माण होवू नयेत म्हणून अतिक्रमण काढण्याची मोहीम पावसाळ्यानंतर तातडीने सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया आणि त्यांच्य प्रशासनातील सर्व विभागांनी वेळीच योग्य निर्णय घेवून केलेल्या उपाय योजनामुळे नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात मोठे यश आले.पूर परीस्थिती ओसरल्यानंतर झालेल्या नूकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल.पण परीस्थीती पाहाता सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नुकसान झालेल्या घरांना मदत किंवा घरकुल योजनेत घराची उपलब्धता करून देता येईल का याबाबत अधिकार्यांनी विचार करावा.स्थलांतरीत नागरीकांना फुड पॅकेटचे नियोजन करण्यात आले आहे.यापुर्वी आशा आपतीत शासनाने मदत केली आहे.आताही मदतीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


झालेल्या नूकसानीचा अंदाज पाहाता मोठ्या प्रमाणात अर्थिक मदत लागणार आहे.मदत व पुनर्वसन विभागाकडे याबाबत प्रयत्न होतीलच परंतू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून अधिकची मदत जिल्ह्यातील नूकसानीसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती करणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

पाथर्डी तालुक्यातील करंजी तिसगाव कासार पिंपळगाव या गावात झालेल्या नूकसानीची पाहाणी करून नागरीकांना दिलासा दिला.जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे जलसंपदा विभागाचे स्वप्निल काळे सायली पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post