राहाता ः दैनिक जनता आवाज व कृषीभारत मीडिया आयोजित कोल्हार भगवतीपूर नवरात्र खरेदी महोत्सवाला माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी भेट दिली. या महोत्सवातील प्रत्येक स्टाॅटलला भेट देऊन त्यांनी प्रत्येक स्टाॅलधारकांशी चर्चा केली.
कोल्हार भगवतीपूर येथे दैनिक जनता आवाज व कृषीभारत मीडिया आयोजित कोल्हार भगवतीपूर नवरात्र खरेदी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सावाला कोल्हारसह पंचक्रोशीतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पावसाने हजेरी लावलेली असली तरी या महोत्सवातील प्रत्येक स्टाॅलला नागरिक भेट देऊन खरेदी करीत आहेत. तसेच या परिसरातील खवय्ये फूट स्टाॅलला भेट देऊन त्याचा अस्वाद घेत आहे.
डाॅ. सुजय विखे पाटील यांनी सर्व स्टॉल्सला भेट देऊन खाद्यपदार्थांची चव चाखली. या महोत्सवातील स्टाॅलवर जेवणाचा अस्वाद सुजय विखे पाटील यांनी घेतला.
याप्रसंगी कृषी भूषण राजेंद्र कुंकलोळ, अनिल शंकरराव खर्डे पाटील, कोल्हार बुद्रुक चे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे, पद्मश्री विखे कारखान्याचे संचालक बापू तात्या कडसकर, श्रीकांत खर्डे, जनता आवाज चे संपादक अजित मोरे, जनता आवाज चे कार्यकारी संपादक महेश रक्ताटे प्रवरा सहकारी बँकेचे संचालक सुधीर आहेर अनिल येवले आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment