तारकपूर आगारात चालकाची आत्महत्या

अहिल्यानगर : तारकपूर एसटी आगारात बुधवारी रात्री एका एसटी चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी  आगारातच उघडकीस आली आहे.


मृत चालकाचे त्याचे नाव अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाही. बुधवारी सकाळपासून आगारात कामकाजाच्या विविध मुद्द्यांवरून चालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद झाल्याची चर्चा कर्मचार्यांमध्ये आहे. 

रात्री उशिरा चालकाने गळफास लावून आपले जीवन संपवले.  ही घटना आज गुरवारी उघडकीस आली. तातडीने याची माहिती पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post