आढळगाव पंचायत समिती गणात भाजप चे पारडे जड

अहिल्यानगर : आढळगाव पंचायत समिती गण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाला असून या गणात भाजपा चे पारडे जड दिसत आहे. 


आढळगाव पंचायत समिती गण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी  राखीव झाल्यामुळे  अनेकांनी  या गटावर लक्ष केंदीत केले असून या गणात राधा ठवाल या इच्छुक्क असून भाजप महायुती कडून आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचे समर्थक अमर छत्तीसे यांच्या पत्नी संध्या अमर छत्तीसे व माजी पंचायत  सदस्य रामदास घोडके यांच्या पत्नी सविता रामदास घोडके या इच्छुक असून या गटात आमदार विक्रमसिंह पाचपुते जो निर्णय घेतील तो निर्णय अंतिम असणार आहे.. तरी या गणात भाजपा चे पारडे जड असणार आहे.



मामा भाचे यांचा निर्णय अंतिम व निर्णायक!

माजी पंचायत समिती सदस्य रामदास घोडके व आढळगावं चे अमर छत्तीसे हे नातेवाईक असून मामा भाचे आहेत त्यामुळे भाजपा कडे अंतिम निर्णय मामा भाचे घेतील त्यावर पक्ष व वरिष्ट नेते निर्णय घेतील..



नेत्यांचा आदेश शिरसावंदय....

आमचे नेते माजी मंत्री बबनराव पाचपुते व आमदार विक्रम पाचपुते पंचायत समिती गणाबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. आम्ही फक्त व्यावसायिक  कार्यकर्ते नसून हाडाचे कार्यकर्ते आहोत.



उमेदवारी माझ्या पत्नीला.किंवा माझ्या् भाचा अमर छत्तीसे याच्या पत्नीला मिळो काही अडचण नाही पण काही अर्धवट समाजमाध्यमातून  चुकीच्या बातम्या पसरवत आहेत पण आमचे नेते माजी मंत्री बबनराव पाचपुते व आमदार विक्रमसिंह पाचपुते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. अशी प्रतिकिया रामदास घोडके यांनी दिली..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post