पारनेर : तालुक्यात सध्या “दहा हजारांच्या दिवाळी”ची चर्चा प्रचंड रंगली आहे. गावात चहाच्या टपऱ्यांपासून सोशल मीडियापर्यंत या किस्स्याची जोरदार चर्चा सुरू असून, दिवाळी संपूनही या घटनेचा गाजावाजा थांबलेला नाही.
पारनेर तालुक्यातील एका व्यक्तीने दिवाळीच्या तयारीसाठी तब्बल दहा हजार रुपये घेतले. सण जवळ आल्याने त्याने घराची सजावट, नवीन कपडे, फटाके, गोडधोड पदार्थ आणि पाहुणचार यावर भरपूर खर्च केला. मात्र सण संपताच त्याच्या खिशात काहीच शिल्लक उरले नाही. दुसऱ्याचे पैसे घेऊन घरच्या खर्चासाठी वापरल्याचे समजताच गावात या गोष्टीची चर्चा चांगलीच रंगली.
या “दहा हजारांच्या दिवाळी”मुळे पारनेर तालुक्यात हास्यविनोदाचा माहोल निर्माण झाला आहे. गावातील चहाच्या टपऱ्यांवर, चौकात आणि शेतातही “तोच का तो २० हजारवाला?” असा प्रश्न विनोदाने विचारला जात आहे. सोशल मीडियावर या घटनेवर मीम्स, जोक्स आणि व्हिडिओ फिरू लागले आहेत.
काही जण या गोष्टीकडे विनोदी दृष्टिकोनातून पाहत आहेत. “सण म्हणजे आनंदाचा काळ, त्यात थोडंफार खर्च झालं तरी चालतं,” असे काहींचे मत आहे. तर काहीजणांनी यावर संतुलित प्रतिक्रिया दिली आहे. “सण साजरा करा, पण विवेकाने करा; दुसऱ्याच्या पैशांनी आनंद विकत घेता येत नाही.”
या घटनेची अधिकृत नोंद नसली तरी “दहा हजारांच्या दिवाळीचा किस्सा” सध्या पारनेर तालुक्यात सध्या चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे. दिवाळीची रोषणाई ओसरली असली, तरी या चर्चेची ज्योत अजूनही तेजाने पेटलेली दिसते.

Post a Comment