संगमनेर ः संगमनेर विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेले आमदार अमोल खताळ यांच्या प्रचारासाठी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काम केले. त्यांच्या प्रचारात त्यांचा एकही कार्यकर्ता नव्हता. मात्र भाजपच्या जीवावर आमदार झालेले अमोल खताळ यांनी घराणेशाही सुरू केली असून आता भाजप संपवण्याचा डाव करत आहे .त्यांनी निधी घेऊन तिकीट वाटप केले असल्याचा आरोप भाजप महिला आघाडीच्या प्रमुख तथा माजी नगरसेवक सौ मेघा भगत यांनी केला आहे.
मेघा भगत म्हणाल्या की,आम्ही 2016 पासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ता आहोत मागील सत्रामध्ये मी एकमेव भाजपची महिला नगरसेविका होते. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अत्यंत जीवाचे रान करून अमोल खताळ यांना निवडून आणले त्यावेळी खताळ यांचे कोणतेही कार्यकर्ते नव्हते.
मात्र सत्तेवर आल्यानंतर खताळ यांनी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्याचे काम केले आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये निधी घेऊन तिकिटांचा वाटप केले आहे. निष्ठावंतांवर अन्याय केला आहे. संगमनेर नगरपालिकेसाठी 10 जणांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये असा निर्णय होता की सुकाणू समितीच्या सदस्यांनी उमेदवारी करू नये. मात्र असे असताना सुद्धा आमदार खताळ यांनी मनमानी करत त्यांच्या समर्थकांना तिकीट वाटप केले. तिकीट वाटपामध्ये मोठा गोंधळ झाला. निधी घेऊन तिकीट वाटप करण्यात आले आहे. यामुळे निष्ठावंतांना डावलले गेले असून ते नाराज आहे. अमोल खताळ हे शिवसेनेचे आमदार असल्याने संगमनेर भाजपचे खच्चीकरण करण्याचे काम ते करत आहे. याबाबत आम्ही प्रदेशाध्यक्षांकडे सुद्धा तक्रार केली आहे.
अमोल खताळ यांनी घराणेशाही सुरू केली आहे. थोरात,तांबे यांच्या घराणे वर आरोप करण्याचा आता त्यांना कोणताही अधिकार नाही. त्यांच्या भावजय सुवर्णा खताळ या तांबे यांच्या सह्याद्री संस्थेमध्ये नोकरीला आहे. त्यांनी कधीही शिवसेनेचा किंवा महायुतीचा प्रचार केला नाही. किंवा त्यांचे महायुतीसाठी कोणतेही योगदान नाही. फक्त घराणेशाही मुळे त्यांना थेट नगराध्यक्ष पदाचे तिकीट दिले आहे. मग आमच्यासारख्या निष्ठावंतांनी काय करायचे असा सवाल करताना संगमनेरच्या जनतेला आता सर्व कळून चुकले आहे. आम्ही भाजपचेच आहोत भाजपमध्येच राहणार असल्याचे सौ मेघा भगत व दीपक भगत यांनी सांगितले
भाजपच्या निष्ठावंतांनी फक्त तुमच्या सतरांज्या उचलायचा का
आम्ही कायम भाजपचे निष्ठावंत आहोत. विधानसभेसाठी भाजपला उमेदवारी मिळावी ही मागणी आम्ही केली आणि तो राग धरून आमदार अमोल खताळ यांनी आमचे तिकीट कापले. सुवर्णा खताळ यांचे महायुतीसाठी योगदान काय असा सवाल करताना तुमच्या घरातील आहे म्हणजे तुम्ही तिकीट देत असेल तर निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायचा का असा सवाल करताना जनता तुम्हाला या निवडणुकीत धडा शिकेल असे दीपक भगत यांनी सांगितले आहे.

Post a Comment