नेवाशात युतीच्या प्रचाराचा मंगळवारी शुभारंभ

नेवासा ः नेवासा नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली आहे. या वेळी नेवाशात तिरंगी लढत होत असली तरी भाजप-शिवसेनाचा वरचष्मा कायम असल्याचे दिसून येत आहे. सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरवात केलेली आहे. भाजप-शिवसेना युतीच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवार (ता. २५) रोजी होणार आहे, अशी माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली.


नेवासा नगरपंचायत निवडणुकीतील युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार करणसिंह घुले यांच्या निवासस्थानी भाजप-शिवसेना पदाधिकार्यांची नियोजन बैठक रात्री उशिरा पार पडली. या वेळी आमदार विठ्ठलराव लंघे, उत्तर भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, उद्योजक प्रभाकर काका शिंदे, भाऊसाहेब वाघ, जानकीराम डौले, प्रताप चिंधे, प्रकाश निपुंगे, बंडु शिंदे आदींसह युतीचे सर्वच उमेदवार या वेळी उपस्थित होते.

या बैठकीत युतीच्या प्रचाचारा नारळ खोलेश्वर गणपती मंदिर व ग्रामदैवत मोहिनीराज मंदिर मंगळवारी माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थित वाढवायचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तोपर्यंत सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरुच ठेवाव्यात, अशी सूचना या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी दिली. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे व उद्योजक प्रभाकर शिंदे यांनी मार्गदर्शन केले. नगराध्यक्षपदाचे उमेदवार करणसिंग घुले यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post