विकासात पीएचडीचा दावा; तर किती कामे केली याचा हिशोब द्या!

संगमनेर : “संगमनेर शहराचा परिपूर्ण आराखडा राबवणार असून विकासकामांसाठी निधी आणण्यात आमची पीएचडी आहे,” असे विधान आमदार सत्यजीत तांबे यांनी केले होते. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कडाडून समाचार घेत प्रखर टीका केली आहे. चौकसभेच्या माध्यमातून त्यांनी आमदार तांबे यांच्याच शैलीत त्यांना सवालांची मालिका सुनावली.


शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चौकसभेत थेट प्रश्न केला की, “आपण आमदार होऊन किती दिवस झाले? त्या काळात आपण नेमका किती निधी संगमनेर तालुक्यासाठी आणला? तसेच तालुक्यातील हजारो बेरोजगार पदवीधारक युवकांना रोजगार निर्मितीबाबत कोणते प्रयत्न केले?” हे सर्व जनतेसमोर स्पष्ट करावे.

पदाधिकाऱ्यांनी असेही म्हटले की, संगमनेरमध्ये अद्यापही रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या समस्या कायम आहेत. “जमिनीवर काहीच दिसत नसताना विकासाची पीएचडी घेतल्याचा दावा करणे म्हणजे जनतेची दिशाभूल आहे,” अशी टीका त्यांनी केली.

शिवसेनेच्या टीकेनंतर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा सुरू असून दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्येही चर्चांचा उत फान पाहायला मिळतो आहे.

आता तांबे हे टीकेला काय उत्तर देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post