सोनई : मुळा सहकारी साखर कारखाना लि., सोनईच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार पॅनलने प्रचाराचा वेग वाढविला असून उमेदवारांच्या प्रचारार्थ विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सहकार पॅनल पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेली ही सभा २४ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता मुळा पब्लिक स्कूल, सोनई येथे होणार आहे. सभेला माजी मंत्री तथा माजी आ. शंकरराव गडाख पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. माजी खासदार यशवंतरावजी गडाख अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने विविध मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचाराला चालना देण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार पॅनलच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मुळा कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून आगामी काळात प्रचारसभांना अधिक वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.

Post a Comment