नेवाशात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

नेवासा : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ज्ञानोदय इंग्लिश स्कूल नेवासा, कै. सौ. सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालय नेवासा तसेच नेवासा नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमात योगगुरू प्रा. मनोज जरे यांनी विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाची भूमिका याविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.

कार्यक्रमाला नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, प्रशासक सागर झावरे, माजी प्राचार्य सतीश मुळे (आबा), प्राचार्य रावसाहेब चौधरी, प्राचार्या सुरेखा पारखे, पर्यवेक्षक सुनील धस, पर्यवेक्षक अरुण चौधरी तसेच नगरपंचायतीचे राजेश्वर सोनवणे, परशुराम डौले, नवनाथ मतकर, सुधीर चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

योग व प्राणायामाची प्रात्यक्षिके अनुभवत विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवर योगाभ्यासात सहभागी झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य रावसाहेब चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी योगगुरू प्रा. मनोज जरे यांचा नेवासा नगरपंचायत व विद्यालयांच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय आखाडे यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post