दो बुंद जिंदगी के’… नेवासा शहरात पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ; हजारो बालकांना लसीकरणाचे लक्ष्य

नेवासा : देशाला पोलिओमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ अभियानाचा नेवासा शहरात उत्साहात शुभारंभ करण्यात आला. “दो बुंद जिंदगी के…” या जनजागृती संदेशासह पाच वर्षाखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली.


या वेळी सर्वश्री दिनेश व्यवहारे, गौरव चव्हाण, भारतजी बोडखे, सुनीलजी साळुंखे, भैय्या सोनवणे, वैद्यकीय अधिकारी रविंद्र कानडे यांच्या उपस्थितीत बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. कार्यक्रमास पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावत अभियानाला प्रतिसाद दिला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आरोग्यमंत्री प्रकाश  आंबिटकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर हे अभियान राबविण्यात येत आहे.

तालुकास्तरावर आमदार विठ्ठलराव लंघे  यांच्या नेतृत्वाखाली नेवासा तालुक्यात सुमारे 31 हजार 114 बालकांना पोलिओ लसीकरणाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. यासाठी तालुकाभरात 203 बूथची उभारणी करण्यात आली असून आरोग्य विभाग, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक प्रशासन यांचे समन्वयाने अभियान सुरू आहे.

आरोग्य विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, पाच वर्षांखालील कोणतेही बालक पोलिओच्या डोसपासून वंचित राहू नये. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला वेळेत लस देऊन पोलिओमुक्त समाजाच्या प्रयत्नात सहभाग नोंदवावा.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post