नेवासा : नगराध्यक्ष करणसिंह घुले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरात स्वच्छता मोहिमेला सुरुवात केलेली आहे. ही मोहीम शहरात अधूनमधून सुरूच आहे. त्यामुळे शहर स्वच्छ सुंदर दिसत आहे. त्यांनी प्रशासनाला प्रत्यक्ष कामावर आणण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
डॉक्टर म्हणून नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांची जाण असलेल्या नेतृत्वाकडून शहराच्या मूलभूत प्रश्नांवर परिणामकारक काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहरात काही ठिकाणी पूर्वीच्या काळातील विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित केले जात असताना, नव्या नेतृत्वाने आरोप-प्रत्यारोपांमध्ये न अडकता प्रत्यक्ष कामातून उत्तर देण्याची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. स्वच्छतेपासून सुरुवात करून शहर व्यवस्थापन, आरोग्य आणि सुविधा सुधारण्यावर भर दिला जात असल्याचे समर्थकांचे मत आहे.
नगराध्यक्ष घुले यांच्याकडे नागरिक मोठ्या अपेक्षेने पाहत असून, शहराच्या विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचा समन्वय महत्त्वाचा आहे. आमदार विठ्ठलराव लंघे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रलंबित प्रश्न सोडवून विकासकामांना गती दिली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, काही स्तरातून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचीही चर्चा आहे. मात्र शहराच्या हितासाठी मतभेद बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
चर्चा आणि टीका सुरूच राहतील; पण शहराच्या प्रगतीचा मार्ग प्रत्यक्ष कामातूनच ठरणार आहे. आणि त्यासाठी नगराध्यक्ष करणसिंह घुले यांना संधी देणे आवश्यक असल्याचे मत शहरातून पुढे येत आहे.

Post a Comment