नगर ः जिल्ह्यात काेराेना बाधितांची आकडेवारी कमी येऊ लागल्याने आता प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक नियमात शिथिलता देण्यात येत आहे. परंतु प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. बुधवारी जिल्ह्यात 858 बाधीत आढळून आलेले हाेते. त्यात आज (गुरुवारी) 468ने वाढ झालेली आहे.
जिल्ह्यातील काेराेना प्रादुर्भाव राेखण्यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययाेजना केल्या जात आहे. परंतु तरीही बाधितांची संख्या दिसून येत आहे.
हे वाचा ः आराेग्य कर्मचारी म्हणतात.. आम्हीही माणसंच आहाेत...आम्हालाही भावना आहेत...
मे महिन्याच्या तुलनेत हा आकडा कमी असल्याने सर्वांना दिलासा असला तरी हा आकडा शून्य टक्के करण्यासाठी सर्वांनीच काेराेना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात दिवसभरात 1326 बाधित आढळून आलेले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील तपासणीत 268, खासगी तपासणीत 686 व रॅपिड तपासणीत 372 जण आढळून आलेले आहेत.
हे वाचा ः आराेग्य कर्मचारी म्हणतात.. आम्हीही माणसंच आहाेत...आम्हालाही भावना आहेत...
नगर शहरातील आकडेवारी कमी असली तरी बुधवारच्या तुलनेत आज गुरुवारी 14ने बाधितांचा आकडा वाढलेला आहे. आज गुरुवारी नगर शहरात 68 जण बाधित आढळून आलेले आहेत.
संगमनेर तालुक्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा आघाडी घेतलेली आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 136 रुग्ण आढळून आलेले आहेत. जामखेड तालुका दुसर्यास्थानी असून जामखेडमध्ये 127 बाधित आढळून आलेले आहे. तिसर्यास्थानी नगर तालुका असून नगर तालुक्यात सर्वाधिक 123 बाधित आढळून आलेले आहेत.
Post a Comment