मागील लिलावाच्या तुलनेत कांद्याच्या भावात घसरण


पारनेर  ः
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या साडेसहा हजार गोण्यांची आवक झाली. मागील लिलावाच्या तुलनेत आज कांद्याच्या भावात 200  रुपयांची घसरण झाली. मागील लिलावात कांद्याला 2400 रुपयांचा भाव मिळाला होता. आज एक नंबर कांद्याला 2200 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

पारनेर बाजार समितीत आज (रविवारी) कांद्याच्या नऊ हजार 703 कांदा गोण्यांची आवक झाली होती. एक नंबर कांद्याला 2200 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. मागील लिलावाच्या तुलनेत आज कांद्याच्या भावात दोनशे रुपयांनी घसरण झाली आहे. 


कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः 2000 ते 2200,  दोन नंबर कांदा ः 1500 ते 1900, तीन नंबर कांदा ः एक हजार ते 1400, चार नंबर कांदा ः 200 ते 900. 

एक नंबर कांद्याच्या कमीत कमी भावात 100 रुपयांची तर जास्तीत जास्त भावात 200 रुपयांची घट झाली. दोन नंबर कांद्याचे कमीत कमी भाव स्थिर असून जास्तीत जास्त भावात 100 रुपयांनी घट झाली आहे. तीन व चार नंबर कांद्याचे भाव मात्र स्थिर होते. शुक्रवारच्या तुलनेत आज कांद्याची आवक वाढली होती. 

शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करून आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड व संचालक मंडळाने केलेले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post