अमर छत्तीसे
श्रीगोंदा : : नाशिक येथील शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेतर्फे कर्जत येथील पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना राज्यस्तरीय शिवपुत्र पुरस्कार देऊन सन्मानचिन्ह, गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
नाशिक येथील शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेतर्फे राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, उद्योग व प्रशासकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय शिवपुत्र व शिवपुत्री पुरस्कार देऊन सन्मानचिन्ह, गौरवपत्र देऊन हा सत्कार करण्यात आला.
शहरातील महाबळ परिसरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात ज्येष्ठ पत्रकार विकास भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून माजी पालकमंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर व महापौर जयश्री महाजन उपस्थित होते. यवतमाळ येथील साहित्यिक अशोक राणा व वीरमाता निलाताई कौतीक आमले यांची यावे
ळी विशेष उपस्थिती होती.
ळी विशेष उपस्थिती होती.
रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील, कर्जत येथील पोलिस उपअधिक्षक आण्णासाहेब जाधव, अमळनेर येथील जिजाऊ संस्थेच्या अध्यक्षा अँड. ललिता पाटील, औरंगाबाद येथील संतोष भंडारी, नवापूर येथील ईश्वर चौधरी, ईकरा संस्थेचे अध्यक्ष करीम सालार, सिन्नर येथील उद्योजक लक्ष्मण डोळे, विरार येथील उपनिबंधक योगेश देसाई, राहुरी येथील विद्या करपे आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला. उद्योजक श्रीराम पाटील, अँड. ललिता पाटील, करीम सालार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी गुलाबराव देवकर यांचे सावेळी भाषण झाले. साहित्यिक अशोक राणा व विकास भदाणे यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाची सामूहिक राष्ट्रगीताने सांगता झाली.
Borgata - Dr.Mcd
ReplyDeleteBorgata Atlantic 울산광역 출장마사지 City Borgata Hotel 창원 출장샵 Casino 광명 출장안마 & Spa. 1 성남 출장샵 Borgata Way, Atlantic 원주 출장샵 City, NJ 08401. Phone. 1.862.7711.
Post a Comment