त्या अधिकाऱ्यावर कारवाई कधी होणार

नगर ः जिल्हा परिषदेतील एका विभागातील अधिकाऱ्याने एका नेत्याच्या फोटो व पक्षाचे चिन्ह असलेली पोस्ट निवडणूक काळात व्हायरल केली होती. या प्रकरणी संबंधिताविरोधात तक्रारही दाखल झालेली आहे. मात्र त्यावर ठोस कारवाई अद्याप झालेली नाही. या विषयी सध्या जिल्हा परिषदेच्या वर्तुळात एकच चर्चा सुरु आहे.


जिल्हा परिषदेतील काही शिक्षकांनी लोकसभा निवडणुकी काळात पोस्ट व्हायरल केल्या होत्या. त्या बाबत तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने त्या शिक्षकांवर कारवाई केलेली आहे.तशीच तक्रार एका अधिकाऱ्याबाबत प्रशासनाला दाखल झालेली आहे. त्यावर निवडणूक विभागाकडूनही पत्रव्यवहार झालेला आहे. मात्र त्यावर पुढे काय झाले याचे कोडे मात्र अद्याप उलगडलेले नाही. 

ते अधिकारी निर्दोष होते का त्यांना निर्दोष कोणी ठरविले. ज्या ग्रुपवर त्यांनी पोस्ट केली त्या ग्रुपची माहिती प्रशासनाने घेतली का, पोलिस प्रशासनाच्या सायबर सेलकडून त्या ग्रुपची तपासणी होणे गरजेचे आहे, असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे. 

ते अधिकारी निर्दोष असतील तर त्यांचे स्वागतच आहे, परंतु दोषी असूनही प्रशासन जर त्यांना पाठीशी घालत असेल तर मात्र ही बाब चुकीची आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चेली जात असलेली ती बाब प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचेलली आहे. त्यांनीही त्याकडे विशेष लक्ष घालून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी होत आहे.

साधा कर्मचारी असल्यानंतर प्रशासन त्यावर कारवाई तातडीने करते. मात्र एका अधिकाऱ्याबाबत प्रशासनाकडे तक्रार आलेली आहे. त्या तक्रारीवर तातडीने कारवाई होणे अपेक्षीत होते. मात्र तशी कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासन भेदभाव करीत असल्याची चर्चा सध्या करीत आहे. त्या प्रकरणात नेमके काय सत्य आहे, याची माहिती प्रशासनाने उघड करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारभावर नाहक ताशेरे ओढले जात आहे. हा प्रकार प्रशासनाने समोर आणणे गरजेचे आहे.

1/Post a Comment/Comments

  1. भघा -धका्घाईकडून पँसे ‘ळाघावर

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post