अकोले, संगमनेर अन् पारनेरात कोरोनाचा उद्रेक कायम


नगर ः
  जिल्ह्यात दिवसभरात 776 बाधित आढळून आलेले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण अकोले, संगमनेर व पारनेर तालुक्यात आढळलेले आहेत.  सध्या कोरोनाचा उद्रेक अकोले, संगमनेर व पारनेर तालुक्यात सर्वाधिक आहे. दिवसभरात नगर शहरात 34 रुग्ण आढळलेले आहेत.

हे वाचले का ः कर्जतमध्ये राजकीय भूकंप होणार....भाजपाचा एक नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर...

जिल्हा रुग्णालयातील तपासणीत 155, खासगी तपासणीत 361, रिपिड तपासणीत 260 असे एकूण 776 बाधित आढळलेले आहेत. दिवसभरात अकोले तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. अकोले तालुक्यात सर्वाधिक 137 रुग्ण आढळलेले आहेत. त्याखालोखाल संगमनेर तालुक्यात रुग्ण आढळले आहेत. 

संगमनेरमध्ये 116 बाधित आढळून आलेले आहेत. तिसऱ्यास्थानी पारनेर तालुक्याचा नंबर लागत आहे. पारनेर तालुक्यात 76 बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून संगमनेर, अकोले व पारनेर तालुक्यांमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली केली जात असली त्याचे पालन जिल्ह्यातील अनेक भागात केले जात नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post