सैराटमधील प्रिन्स पोलिसांना शरण....

राहुरी : मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना लाखोंचा गंडा घातल्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी सैराट फेम प्रिन्स तथा सुरज पवारला शुक्रवारी वकीलांसह राहुरी पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला.  


महेश बाळकृष्ण वाघडकर (रा. भेंडा फॅक्टरी, ता. नेवासा) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दोन लाखांची फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. 

त्यानुसार, दत्तात्रेय अरुण क्षीरसागर (रा. नाशिक), आकाश विष्णू शिंदे, ओंकार नंदकुमार तरटे (दोघेही रा. संगमनेर), विजय बाळासाहेब साळे (वय ३७, रा. खडांबे बु., ता. राहुरी) या आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे.  

आरोपींनी वाघडकर यांच्या खोट्या नियुक्तीपत्रावर राजमुद्रेचा गोल व आडवा शिक्का मारलेला आढळला. शिक्के तयार करताना आरोपी शिंदे यांच्याबरोबर सुरज पवार होता. 

असे विनापरवाना शिक्के बनवून देणारा आरोपी तरटे याने चौकशीत सांगितले. त्यामुळे, प्रिन्स तथा सुरज पोलिसांच्या रडारवर आला.  त्याला पोलिस ठाण्यात हजर होण्याची नोटीस काढून, पोलिस पथके शोध घेत होती. 

पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविला.  त्याला, येत्या सोमवारी (ता. २६) रोजी पुन्हा चौकशीसाठी येण्याची नोटीस बजावून, रात्री आठ सोडून देण्यात आले.सुरज पवार यांच्या बँकेच्या खात्यांमधील आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यासाठी येत्या सोमवारी (ता. २६) पुन्हा चौकशीसाठी बोलविले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post