आमदार सातव यांच्यावर हल्ला...

हिंगोली : आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोली जिल्ह्यात हल्ला झाल्याची घटना घडली आहे. 


माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी तथा विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोली जिल्ह्यात हल्ला झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

प्रज्ञा सातव यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. सातवम्हणाल्या, आज माझ्यावर अतिशय निर्घृण असा हल्ला झाला. कळमनुरी येथील कसबे धवंडा येथे हा हल्ला झाला. एका अज्ञात व्यक्तीने पाठीमागून हल्ला केला. 

मला गंभीर इजा पोहोचवण्याचा या हल्ल्याचा प्रयत्न होता. एका महिला आमदारावर झालेला हा हल्ला एकप्रकारे लोकशाहीवरचा हल्ला आहे. समोर येऊन वार करा असे भ्याडपणे मागून हल्ला करु नका, अशा शब्दात प्रज्ञा सातव यांनी या हल्ल्याचा निषेध केला. 

या घटनेमुळे सातव यांच्या समर्थकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यातील हल्लेखोराची सखोल चौकशी करावी, असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post